आमच्या विषयी
गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत मनोरंजनाच्या क्षेत्रात श्री अधिकारी ब्रदर्सचे रसिकांशी अतूट नाते जोडले गेले आहे. हे नाते अधिक दृढ करण्यासाठी, मराठी रसिकांना मनोरंजनासोबत संगीताचा खजिना खुला करून देण्यासाठी श्री अधिकारी ब्रदर्स यांनी निर्मिती केली नव्या संगीत वाहिनीची ‘मायबोली’ची अप्रतिम मराठी गीतांची मेजवानी आणि त्यावर विनोदाची खमंग फोडणी याचा संगम म्हणजे ‘मायबोली’.. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मनाला शांती आणि उर्जा देणारी गाणी, आणि सोबतीला मराठी विनोद वीरांची कमाल-धमाल जिथे आपल्याला रोज पाहायला मिळेल अशी तुमची हक्काची वाहिनी... ‘मायबोली’ आपली आपल्या माणसांची.
गौतम अधिकारी आणि मार्कंड अधिकारी या दोन बंधूंनी या कंपनीच्या माध्यमातून निर्मिती आणि प्रसारण क्षेत्रात केलेली कामगिरी मोलाची आहे. टीव्ही माध्यमात कंपनीने आत्ता पर्यंन्त सब टीव्ही, मस्ती, दबंग, मी मराठी.. अश्या प्रादेशिक आणि हिंदी भाषिक वाहिन्यांद्वारे आपला वेगळा ठसा उमटवला आहे आणि आता मायबोली या नव्या वाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या करमणूकीसाठी श्री अधिकारी ब्रदर्स सज्ज आहे.