हजरजबाबी प्रधानजी आणि वेंधळा राजा या विनोदी जोडगोळीच्या गोष्टी लहानपणापासून आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत. अशाच एका अंधेर नगरीतल्या राजा-प्रधानाच्या जोडीचे अफलातून विनोदी प्रसंग, अन त्याद्वारे आजच्या सामाजिक परिस्थितीवर केलेली मिश्कील टीका म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’.