शाळेत म्हणे मुलांवर संस्कार होतात, पण आमचा विन्या शाळेत त्याच्या मास्तरांचीच शाळा घेतो. अभ्यास सोडून बाकी काहीही करण्यासाठी विन्याला मिळालेलं हक्काचं ठिकाण म्हणजे त्याची शाळा.
शाळेत मित्रांसोबत केलेल्या गमती-जमती, मास्तरांच्या काढलेल्या खोड्या
अन् शाळेच्या दिवसांत आपण केलेल्या मौजमजेला उजाळा देणारी चुटकुल्यांची मालिका म्हणजे ‘वात्रट विन्या’.